सायखेडा/वणी : खरीप हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या टमाट्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वणीसह पिंपळगाव बाजार समितीत २० किलो कॅरेटसाठी टमाट्याला ४० ते सरासरी ८० रुपये भाव मिळाला. काल ४७५१ इतके कमी कॅरेट आवक असूनही बाजारभाव अत्यंत कमी मिळाल्याने उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. हिवाळी टमाटे पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न होईल या आशेने अनेक शेतकºयांनी शेतात खरीप हंगामातील पीक म्हणून टमाटे पिकाची लागवड केली होती. यंदा पावसाळ्यात चांगला भाव मिळाला असल्याने शेतकºयांनी पुन्हा त्या आशेवर टमाट्याची लागवड केली. पीक चांगले व्हावे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ड्रिप, मल्चिंग पेपर, रोपवाटिकेतील रोपे, जैविक खते, रासायनिक खते, महागडी कीटकनाशके, औषधे, वापरून पीक जोमात तयार केले; मात्र बाजारभाव कमी झाल्यामुळे खर्चसुद्धा भरून निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २ रुपये किलो दराने विक्री होत असलेले टमाटे शेतातून तोडणी करून बाजार समितीपर्यंत येणारा वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी शेतातून तोडणी करण्याचे बंद केले आहे, तर काहींंनी नाईलाजाने उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने अनेक व्यापारी टमाट्याची खरेदी बंद करून द्राक्ष खरेदीकडे वळत आहे शिवाय द्राक्षाचे बाजारभावसुद्धाकमी असल्याने छोट्या व्यापाºयांचा खरेदीचा कल वाढला आहे, त्यामुळे टमाटे खरेदी करण्यासाठी व्यापाºयांचे प्रमाण कमी झाल्याने बाजार समितीत चढाओढ कमी झाल्याने आणि भरपूर प्रमाणात आवक येत असल्याने भाव कमी झाल्याचे बोलले जात आहे.कांद्याप्रमाणे टमाटे पीक मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे, निर्यातीच्या अटी आणि शर्ती शिथिल कराव्या म्हणजे टमाटे पिकाला चांगला बाजारभाव मिळेल. नगदी पीक म्हणून टमाटे शेतकºयांना चार पैसे मिळवून देतील अशी मागणी अनेक शेतकरी करीत आहे.यंदा कांद्याची रोपे कमी वाढत्या थंडीमुळे आणि बेमोसमी पावसामुळे खराब झाली होती. त्यामुळे कांदा कमी लागला, कांदा कमी असल्यामुळे नगदी पीक म्हणून अनेक शेतकºयांनी टमाटे पिकाची लागवड केली आहे. त्यात भाव गडगडल्यामुळे काही शेतकरी पाण्यापासून व टमाटे या दोन्ही पिकांपासून हुकले असल्याने कर्जबाजारी झाले आहेत. तेल गेले, तूपही गेले हाती धुपाटणे आले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.द्राक्ष उत्पादक चिंतेतद्राक्ष बागायतदार शेतकरी हवामानातील बदलामुळे चिंताग्रस्तझाले आहेत. निफाडसह जिल्ह्याच्या काही भागात द्राक्ष बागांवर डावण्या आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्तर भारतात अतिप्रमाणात असलेल्या थंडीमुळे द्राक्षाला मागणी नसल्याने भाव पडल्याचे व्यापाºयांकडून सांगितले जात असले तरी हंगामात बाजारभाव कमी असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.
तेल गेले...तूपही गेले... दोन रुपये किलो : शेतकरी हवालदिल टमाटा भावात जिल्ह्यात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:39 AM
सायखेडा/वणी : खरीप हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या टमाट्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ठळक मुद्देटमाट्याला ४० ते सरासरी ८० रुपये भाव वाहतूक खर्चदेखील वसूल नाही