ओझर : हनुमान जन्मोत्सवनिमित्त संपूर्ण ओझर शहरात पहाटेपासून भक्तिमय वातावरण होते. मारुती वेस येथील हनुमान मंदिरात प्रसिद्ध पाहुणा मारु ती एक जागृत देवस्थान म्हणून पंचक्र ोशीत प्रसिद्ध आहे.येथे सप्ताह सुरू असल्याने पहाटे चार वाजेपासून काकडा भजन सुरू होते. भाविकांनी जन्मनिमित्ताने एकच गर्दी केली.सूर्योदयाच्या वेळेला सकाळी सव्वा सहा वाजता फुलांची उधळण आणि मंत्रोच्चारात हनुमान जन्म पार पडला. यावेळी ह.भ.प संजय अहेर, प्रवीण वाघ, रूपेश क्षिरसागर, राहुल जंजाळे, दौलत पोटे,पुंडलिक गायकवाड,शिवाजी मोरे,माधव माळी,पोपट बर्डे,बाळासाहेब फुगट, कृष्णा अहेर,राम अहेर,दीपक चौरे,श्रावण पोटे,पांडुरंग अहेर आदिंनी भजन म्हणत वातावरण भक्तिमय केले. बाणगंगा किनारी सावता महाराज मंदिर, राम मंदिर, रूपेश्वर मंदिर, माहेश्वरी बालाजी मंदिर, तानाजी चौक येथील हनुमान मंदिर, मरीमाता मंदिर, प्रभूधाम, शिवाजी नगर येथील हनुमान मंदिरात सकाळी भाविकांनी मोठी गर्दी करत हनुमंतराया चरणी लीन झाले.
ओझरला हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 2:35 PM