शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

मालेगावचे जुने बसस्थानक फुलले प्रवाशांच्या गर्दीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 5:59 PM

दीपावलीसाठी गावाकडे आलेल्या माहेरवाशिणींसह चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी गर्दी केल्याने मालेगाव शहरातील नवे व जुने बसस्थानक फुलून गेले आहे.

जुना मुंबई आग्रा महामार्गावर म्युनिसिपल हायस्कूलपासून सुपर मार्केट दरम्यान नवीन पुलाचे काम सुरू असल्याने नव्या बसस्थानकावरुन जाणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकावरुन सुटत असल्याने या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या अजुन असल्या तरी भाऊबिजेसाठी आलेल्या भगिनी आता आपल्या मुलाबाळांसह पुन्हा सासरी निघाल्या असून त्यांना पोहचविणाºया पालकांनीही गर्दी केली आहे. यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट होते. तरीही नागरिकांत अमाप उत्साह दिसून आला. नवीन बस स्थानकावर नेहमी असणारी गर्दी यावेळी जुन्या बसस्थानकावर दिसत आहे. मालेगाव एसटी आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्याही सुरू केल्या. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालेगाव एसटी आगाराने पुणे, माहुरगड, अक्कलकोट, नाशिक, चाळीसगाव या मार्गावर जादा गाड्या सुरू केल्या आहेत. दहा टक्के भाडे वाढवूनही प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. काही प्रवाशी मात्र खासगी वाहनांचा उपयोग करताना दिसत आहेत. प्रवाशांना सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाच्यावतीने विविध ठिकाणी जाणा-या गाड्या उशिरापर्यंत सोडण्यात येत आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक करणा-या चालकांनी याचा फायदा घेतला.दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज अशा सलग तीन दिवसांच्या सुट्या जोडून आल्याने ग्रामीण भागातही बाहेरगावहून आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. परंतु ब-याच बसेसला फलक नसल्याने लोकांची तारांबळ उडताना दिसत होती. बसमध्ये जागा सांभाळण्यासाठी लोकांमध्ये वाद होत असल्याचे दिसून आले. एस.टी.ने भाडेवाढ केल्याने त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांच्या गर्दीत हात साफ करणाºया चोरट्यांमुळे प्रवाशात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीpassengerप्रवासी