साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रस्त्याशेजारी शाकंबरी नदीकिनारी दिबाबा मंदिरालगत भगवान आदिनाथ यांची यांच्या पुरातन मूर्ती सापडल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, साकोरा येथे ग्रामदैवत दिबाबा यांच्या मंदिरालगत खोदकामात जमिनीखाली सात ते आठ फूटावर जैन धर्माचे भगवान आदिनाथ यांची सन १३३६ वर्षे पुरातन दोन फूट उंचीची मूर्ती आढळून आली. सदर वार्ता पसरताच भाविकांनी मूर्ती दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.जैन धर्माचे आचार्य मुनीश्री सुवीसागरजी महाराज यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनीही एकूण चाळीस किलोमीटर पायी प्रवास करून साकोरा गाठले आणि प्रत्यक्ष पाहणी केली. सदर मूर्तीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन ती येथील जैन मंदिरात ठेवण्यात आली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत प्रशासनाला मात्र कुठलीही माहिती नसून पुरातन विभागाशी संपर्क साधला असता, संबंधित मूर्ती घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.संग्रहालयात ठेवणारपुरातत्व विभागाच्या अभिरक्षक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, नाशिकच्या जया वहाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित विभाग प्रत्यक्ष पाहणी करून सदर मूर्ती नाशिकच्या वस्तुसंग्रहालयात नागरिकांना पाहणीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
भगवान आदिनाथांची पुरातन मूर्ती सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:04 AM
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रस्त्याशेजारी शाकंबरी नदीकिनारी दिबाबा मंदिरालगत भगवान आदिनाथ यांची यांच्या पुरातन मूर्ती सापडल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
ठळक मुद्देसाकोरा येथील घटना भाविकांची दर्शनासाठी गर्दी