वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे तालुक्यातील सोमनाथ नगर येथील २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या समाज मंदिराची भिंत कोसळली. सुदैवाने, त्याठिकाणी कोणीही नसल्याने अनर्थ टळला.या समाज मंदिरात गावातील होतकरू मुलांनी व्यायामशाळा चालू केली होती. सदर समाजमंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल गावातील तरुणांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. परंतु व्यायामशाळेच्या दुरुस्तीकडे पंचायतीने नेहमीच दुर्लक्ष केले. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या समाजमंदिराच्या भिंती भिजल्या होत्या. सोमवारी (दि.१) पावसामुळे भिंती कोसळल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या समाजमंदिराची दुरुस्तीची वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन बेंडकोळी यांनी केला आहे. पंचायतीच्या उदासिन भूमिकेमुळे गावातील तरुणांनी स्वत:च समाजमंदिराची दुरु स्ती करु न ,माती टाकुन, ताट्या व दरवाजा बसवून काम केले होते. सदर समाजमंदिर नव्याने बांधून मिळण्याची मागणी होत आहे.
त्र्यंबकेश्वरी सोमनाथनगरला जुने समाजमंदिर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 4:58 PM
सुदैवाने, त्याठिकाणी कोणीही नसल्याने अनर्थ टळला
ठळक मुद्देसमाज मंदिरात गावातील होतकरू मुलांनी व्यायामशाळा चालू केली होती