नाशिक : जगभरात साजरा होणाऱ्या ऑलिम्पिक दिनाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात ज्योत प्रज्वलित करून खेळाडूंनी ही ज्योत रॅलीद्वारे पंचवटी परिसरात मिरवणूक काढून रॅली पूर्ण करण्यात आली. पंचवटी कारंजा येथे अशोककुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.
ऑलिम्पिक दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही क्रीडा साधना, कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि खेळाच्या विविध संघटना आणि संस्था यांच्या वतीने पंचवटी परिसरात काळाराम मंदिर ते पंचवटी कारंजा असे क्रीडा ज्योत आणि क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हॉकीचे ऑलिंपियन पदक विजेते खेळाडू अशोक कुमार ध्यानचंद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याशिवाय मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन, डी. डी. बिटको हायस्कूलच्या वतीने ऑलिम्पिक दिनानिमित्त पायी आणि सायकलवरुन रॅली काढण्यात आल्या.