कळवण : कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला रास्त भाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी व तुरीला रास्त भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर आज दुपारी दीड वाजता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा फेको आंदोलन करण्यात येऊन शासन व प्रशासन यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनानंतर तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे माणिक देवरे, महादू खैरनार, पोपट पवार, मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त करून शासनाचा निषेध केला.यावेळी आंदोलनात सरपंच अशोक पवार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, जयराम पगार, कारभारी वाघ, दिलीप कुलकर्णी, रत्नाकर गांगुर्डे, मधुकर पाटील, प्रकाश जाधव, जगन्नाथ पाटील, प्रवीण जाधव, सुनील मोरे, नितीन पवार, प्रल्हाद देवरे, सोमनाथ पवार, हरिभाऊ वाघ, शीतलकुमार आहिरे, शांताराम जाधव, विनोद खैरनार, राजाराम पवार, सुरेश बागुल, प्रल्हाद गुंजाळ आदिंसह बेज, पाळे, मानूर, पिळकोस, भादवन, गांगवण, भेंडी, खेडगाव, नाकोडे आदि गावातील शेतकऱ्याांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
कांदा फेको आंदोलन
By admin | Published: March 09, 2017 12:55 AM