नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर डिसेंबरअखेरपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला सुमारे दोन महिन्यांच्या विलंबानंतर २५ फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला होता. परंतु, शालेय शिक्षण संचालनालयाकडून या प्रवेशप्रक्रियेविषयीत संपूर्ण तयारी पूर्ण झालेली नसल्याने ही प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता ही प्रक्रिया ५ मार्चला सुरू होणार होणार असून, पालकांना २२ मार्चपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे, तर शाळांना नोंदणी व पडताळीसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिन्यांच्या विलंबाने मुहूर्त सापडला होता. परंतु, ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आल्यानंतरत्यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नोंदणीसाठी दि. ८ ते २२ फेब्रुवारीचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली असून, शाळांच्या नोंदणीकरिता आता दि. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीचे काम सुरू असले तरी ही मुदत वाढविण्यात आली आहे. आता हे काम दि. २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, तर पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आणि पहिली सोडत काढण्यासाठी १४ ते १५ मार्च असे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते.मात्र या प्रवेशप्रक्रियेच्या सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आता पालकांना दि. ५ मार्चपासून दि. २२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार असून, त्यानंतरसोडत जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशप्रक्रियेत झालेल्या बदलांविषयी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अधिकाºयांनाही संकेस्थळावर प्रसिद्ध होणाºया माहितीच्याच अधिकाºयांनाही काम करावे लागत आहे.नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षाआरटईच्या प्रवेशप्रक्रियेची पालकांना सुरुवातीपासून उत्सुकता लागलेली असताना ८ फेब्रुवारीला प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन सुरू झाली. मात्र या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणींमुळे निर्माण झाल्याने संपूर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे, त्यामुळे पालकांनी नवीन वेळापत्रकावियी उत्सुकता वाढली असून, आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सुधारित वेळापत्रक कधी जाहीर होणार याची पालकांना प्रतीक्षा लागली आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:21 AM