शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

कामे वाटपाचा पुन्हा एकदा ‘यळकोट’, अभियंत्याला ठेकेदाराची धमकी

By admin | Published: August 09, 2016 12:37 AM

अध्यक्षांची दांडी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही पोबारा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीच्या बैठकांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडतच असून, १ आॅगस्टच्या तहकूब करण्यात आलेल्या येवला व नाशिक तालुक्यातील कामे वाटपावरून पुन्हा एकदा सोमवारी (दि.८) गोंधळ उडाला.जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीची १ आॅगस्ट रोजी तहकूब करण्यात आलेली बैठक सोमवारी पुन्हा घेण्यात आली. बैठकीत येवला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या सेस निधीतून सुमारे ५२ कामांचे वाटप असताना आणि त्यासाठी निफाड व येवला तालुक्यांतील काही मजूर सहकारी संस्थांनी दावा केल्याने सदस्य आणि मजूर सहकारी संस्थांचालक यांच्यात वाद होण्याची शक्यता असल्याने काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी बैठकीस दांडी मारली. त्यामुळे बैठकीचे अध्यक्षपद हे सचिव कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी स्वीकारले. त्यानंतर येवला तालुक्यातील कामांसाठी रितसर चिठ्ठ्या काढून कामांचे वाटप करण्यात आल्याचे कळते, तर नाशिक तालुक्यातील दहा कामांसाठी प्रत्येकी नऊ अर्ज आल्याने या कामांच्याही चिठ्ठ्या काढून वाटप करण्यात आले. त्यात काही वेळ सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची तू-तू मै-मै झाली. त्यात एका सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामांबाबतचे अर्ज मागे घेण्यावरून एका ठेकेदाराच्या सुपुत्राने हात पाय तोडण्याचे धमकावले. त्यामुळे बैठक वादळी झाली. अखेर सर्व कामांचे वाटप बांधकाम विभागाने करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)