लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : साहेब, कृषी विभागाच्या योजनेमुळे शेततळे मिळाले, इतरही योजनांचा लाभ मिळत आहे. पण, आमच्या भागातील विजेचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील विजेचा प्रश्न सोडवा, असे साकडे त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले.कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला, पण त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्याला पुन्हा अर्ज करण्याची गरज राहाणार नाही, अशा प्रकारचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती भुसे यांनी कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.कार्यक्रमास आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या घरी भेटया पाहणी दौºयात कृषिमंत्र्यांनी धोंडेगाव येथील कासू पुंजा बेंडकुळे या वयोवृद्ध शेतकºयाच्या घरी भेट देउन या आस्थेने चौकशी केली. एकनाथ भोये या शेतकºयाच्या शेतात यंत्राद्धारे भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी कृषिमंत्र्यांनी स्वत: गाळात उतरून मशीनची माहिती घेत भात लागवड केली. कृषिदिनानिमित्त कृषी विभागातर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे येथे बुधवारी (दि.१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते.भुसे यांनी धोंडेगाव, साप्ते, कोणे आदी गावांना भेटी देऊन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. शेतकºयांनी त्यांच्यासमोर वीज समस्येबाबत गाºहाणे मांडले.
योजना मिळाल्या साहेब, विजेचा प्रश्न कायमचा सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:17 PM
नाशिक : साहेब, कृषी विभागाच्या योजनेमुळे शेततळे मिळाले, इतरही योजनांचा लाभ मिळत आहे. पण, आमच्या भागातील विजेचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील विजेचा प्रश्न सोडवा, असे साकडे त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले.
ठळक मुद्देकृषिदिनीच बळीराजाचे आर्जव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे कृषिमंत्र्यांना साकडे