्नरामनगर येथे शॉर्टसर्किटमुळे खाक झालेला ऊस.
रामनगर : लाखो रुपयांचे नुकसानरामनगर : निफाड तालुक्यातील रामनगर येथे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वाऱ्यामुळे वीजवाहक तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर ऊस खाक झाला.गावातील सखूबाई जगन्नाथ बलक यांच्या शेतातील गट नंबर ३२३ मधील एक एकर ऊस जळून खाक झाला. यात आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून शेजारी असलेला तीन एकर ऊस वाचविण्यात यश आले.उष्णता अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याने विझविण्यात अडचणी येत होत्या. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली व शेजारी असलेला तीन एकर क्षेत्रावरील ऊस वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.यापूर्वी आजपर्यंत शॉर्टसर्किटमुळे गोदाकाठ परिसरात ठिकठिकाणी शेकडो एकर क्षेत्रावरील ऊस आगीत खाक झालेला आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महावितरणकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. तातडीने भरपाईची मागणी करण्यात येत आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उसाच्या शेताला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणने याची गंभीर दखल घेऊन त्यात लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणीजोर धरू लागली आहे.