नाशिक : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, ट्रस्टी पुढे येत आहेत. मदतीचा हा यज्ञ असाच धगधगता ठेवण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दीड कोटीरु पयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. मदतीच्या माध्यमातून या संकटाशी दोन हात करण्यासाठी सहकार विभागानेही खारीचा वाटा उचलेला असल्याचे मत, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी व्यक्त केले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. या विषाणूची भीषणतेचे वाढते स्वरूप पाहून वैद्यकीय सुविधा व जीवनावश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन सहकार विभागामार्फत जिल्ह्यातील सहकारी संस्थांनाही करण्यात आले होते. सहकारी संस्थांनी तत्काळ प्रतिसाद देऊन दीड कोटींची मदत जमा केली.पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून २५ लाख, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ११ लाख, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २१ लाख, नाशिक मर्चन्ट बँकेकडून ११ लाख, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाकडून ११ लाख, नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेकडून ०७ लाख, दि पिंपळगाव मर्चन्ट बँककेकडून ०५ लाख, महेश को-आॅप. बँकेकडून ०५ लाख, गोदावरी अर्बन बँकेकडून ३ लाखांसह दोनशे सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दीड कोटींची मदत दिली आहे.