मनमाड : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा पालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून, मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या संकलनातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे. अशीच अवस्था अन्य विभागाची झाली असून, पालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.विविध निधीमधून सुरू असलेली विकासकामे सध्या सुरू असली तरी लॉकडाऊनमुळे पालिकेला अत्यंत कमी प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला आहे. मनमाड पालिकेला कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसल्याचे चित्र असून, घरपट्टी व पाणीपट्टी एकत्रित वसुलीत पालिकेला सन २०१९च्या तुलनेत एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.मनमाड नगरपालिकेने या आर्थिक वर्षात घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे वसुली, बाजार वसुली या विविध करापोटी जवळपास साडेतीन कोटी रुपये कर वसुली केली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या मनमाड नगरपालिकेला वसुलीसाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली. पालिकेला घरपट्टीबाबत एक कोटी रुपये वसुली कमी झाली, तर पाणीपट्टी वसुलीही या वर्षात तब्बल ५० लाखाने कमी झाली आहे. गाळे भाडे ४२ लाख रुपयांनी कमी झाल्याने विकासकामांसाठी मिळणाऱ्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. बाजार वसुली करापोटी मिळणारी रक्कमदेखील दहा लाख रुपये इतकी रक्कम कमी झाली आहे.पालिकेकडून दरवर्षी घरपट्टी- दोन कोटी ४८ लाख १०,८८१, पाणीपट्टी- ९० लाख १० हजार ६५९. गाळा भाडे- ४२ लाख, बाजार वसुली १८ लाख ५० हजार अशी कर वसुली करण्यात येते. यावर्षी पालिकेने स्वच्छता व आरोग्यावर सात कोटी ५९ लाख रु पये खर्च केले आहे. पाणीपुरवठ्यावर दोन कोटी ८0 लाख तर दिवाबत्ती वर २३ लाख ९७ हजार रु पये खर्च केले. वेगवेगळ्या निधीमधून सुरू असलेली विकासकामे शहरात सुरू असली तरी पालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने पालिका स्तरावर करण्यात येणाºया अनावश्यक कामांना ब्रेक लागला आहे.
कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नात दीड कोटी रु पयांची घट झाली आहे. शहरात विविध निधीमधील विकासकामे सुरू असली तरी पालिका स्तरावरील अनावश्यक कामांना ब्रेक लावण्यात आला आहे.- डॉ. दिलीप मेणकर,मुख्याधिकारी, मनमाड