इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर परिसरात एका महिलेने नजरचुकीने दीड लाख रुपये किमतीच्या सुमारे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडीत टाकून दिल्या. सदर बांगड्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी संंबंधित महिलेला परत केल्या.दामोदरनगर परिसरात राहणाºया एका महिलेने रिकाम्या असलेल्या गुलाबजांबच्या बॉक्समध्ये चार तोळे सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी केरकचरा घ्यायला घंटागाडी आली असता सदर महिलेने नजरचुकीने घंटागाडीत सोन्याच्या बांगड्या ठेवलेल्या गुलाबजांबचा बॉक्स टाकून दिला. परंतु काही वेळातच या महिलेच्या लक्षात सदर बाब आली. त्यानंतर तिने खत प्रकल्पावरील कचरा डेपो गाठला. तिने घंटागाडी कर्मचाºयांना सदर घटना सांगितल्यानंतर घंटागाडीवरील कर्मचारी ज्ञानेश्वर साळुंखे व उमेश दोंदे यांनी घंटागाडी कचरा खाली करून सोन्याच्या बांगड्या ठेवलेला गुलाबजांबचा बॉक्स सापडून दिला.कर्मचाºयांचे सहकार्यसोन्याच्या बांगड्या चुकून घंटागाडीत टाकल्याची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने कचरा डेपो गाठून तेथील कर्मचाºयांना याबाबतची माहिती दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाºयांनी महिलेस धीर देत कचºयातून बांगड्या सापडून देण्यासाठी लागलीच मदत सुरू केली. कचºयाच्या ढिगाºयातून बांगड्या शोधण्यासाठी कामगारांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि बांगड्या महिलेच्या स्वाधीन केल्या.
घंटागाडीत दीड लाखाच्या सोन्याच्या बांगड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:25 PM
पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर परिसरात एका महिलेने नजरचुकीने दीड लाख रुपये किमतीच्या सुमारे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडीत टाकून दिल्या. सदर बांगड्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी संंबंधित महिलेला परत केल्या.
ठळक मुद्देकर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा : कचरा डेपोत महिलेने घेतली धावा