नाशिक : गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडातदेखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्यामारु तीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शनिवारी दुपारी साडेचार वाजेपासून गंगापूर धरणातून तीन हजार क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला गेला. आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणात धरणक्षेत्रात उघडीप दिली आहे. सध्या गंगापूर धरणाचा जलसाठा ९४.२१ टक्के इतका इतका आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आंबोली, त्र्यंबकेश्वर, गौतमी, कश्यपी या परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी सोडण्यात वाढ केली जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.गोदावरीच्या पातळीत वाढगंगापूर धरणसमूहातील लघुप्रकल्प असलेल्या कश्यपी धरण ६२ टक्के तर गौतमी ७२ टक्के भरले आहे. पहाटे ६ वाजेपर्यंत गंगापूरमध्ये १६ तर आंबोलीत ३३, गौतमीच्या क्षेत्रात २६ आणि त्र्यंबकेश्वरमध्ये १९ मिमी इतका पाऊस पडला.
गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेक पाणी झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 1:33 AM