नाशिक : गंगापूररोडवरील एलिमेंट या अॅपल कंपनीच्या दालनचे शटर उचकटून ८२ आयफोन, स्मार्टवॉचसह रोख रक्कम असा एकूण ७३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट करणाºया ‘चादर गॅँग’च्या गुन्हेगारांपैकी एका संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यामधील एका गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार आयफोन जप्त करण्यात आले आहेत.गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी सहा अज्ञात चोरट्यांनी एलिमेंट दुकानात जबरी लूट केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बिहार गाठले. येथील घोडसाहन गावातून संशयित अजयकुमार मोहन साहा यास पथकाने अटक केली. त्याच्याकडून आयफोन कंपनीचे मोबाइल जप्त केले.लवकरच सर्व साथीदारांना अटक करण्यात येईल, असा विश्वास शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बिहार राज्याचे महासंचालकांशी संपर्क साधत या गुन्ह्यातील तपासात स्थानिक पोलिसांची गुन्हे शाखेच्या तपासी पथकाला मदत करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक संशयित पोलिसांना मिळून आला आहे.सात आरोपींचा समावेशमोबाइल चोरीच्या गुन्ह्यात तपासादरम्यान सात आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर ऊर्फ सेलुवा मुस्तफा दिवाण, सलमान ऊर्फबेलुवा मुस्तफा दिवाण, रियाज ऊर्फकैमुद्दीन मियां, नईम ऊर्फमुन्ना दिवाण, नसरु द्दीन बेचल मियां, मुस्लीम तैय्यम मियां ही सहा संशयितांची चादर गॅँग चोरीचे मोबाइल नेपाळ व बांगलादेशमध्ये जाऊन विक्र ी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे.
आयफोन लांबविणाऱ्या टोळीमधील एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:03 AM
गंगापूररोडवरील एलिमेंट या अॅपल कंपनीच्या दालनचे शटर उचकटून ८२ आयफोन, स्मार्टवॉचसह रोख रक्कम असा एकूण ७३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट करणाºया ‘चादर गॅँग’च्या गुन्हेगारांपैकी एका संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यामधील एका गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार आयफोन जप्त करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देपथक नेपाळच्या सीमेवर : ‘चादर गॅँग’मधील गुन्हेगार निष्पन्न