नाशिक : नातेवाइकांशी बोलत असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शालिमार परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. सनी किशोर देवाडिगा (रा. मातंगवाडा, भद्रकाली) हा संशयित मातंगवाड्यातील २३ वर्षीय युवती शनिवारी रात्री शालिमार परिसरातील शेरावली माता देवी मंदिरासमोर आपल्या नातेवाइकांशी बोलत असताना तेथे आला. तुला पेढे खाऊ घालतो असे म्हणून त्याने नातेवाइकांसमोर महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी संशयित सनी देवाडिगा यास अटक केली आहे.महिलेला ७५ हजारांना गंडाबजाज फायनान्स कंपनीच्या विम्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्याचा ओटीपी क्रमांक मिळवून एका महिलेला सुमारे ७५ रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका अनिल कुलकर्णी (रा. राणेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून १३ तारखेला भामट्यांनी कुलकर्णी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधत बजाज फायनान्स इन्शुरन्सचे आमिष दाखिवले. यावेळी महिलेकडून बॅँक खात्याची विचारपूस करून एटीएमचा फोटो मागवून तसेच ओटीपी क्रमांक प्राप्त करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिळालेल्या ओटीपी क्रमांकाच्या आधारेत संशयितांनी कुलकर्णी यांना तब्बल ७४ हजार ८९८ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल के ला आहे.
विनयभंगप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:13 AM