नाशिक : आरटीओ अधिकाºयाच्या संकेतस्थळावरील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून वाहने तपासणीसाठी न आणताच त्यांच्या फिटनेस प्रमाणपत्राची नोंदणी करून शासनाची फसवणूक करणाºया संशयितास सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ दीपक गिरधरलाल पटेल असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात एमएच १५ इजी ४५२१ व एमएच १५ इजी ४६२१ ही दोन वाहने तपासणीसाठी न आणता त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे व यासाठी आपला लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर केल्याचे व्यवसाय मोटार परिवहन निरीक्षक हेमंत हेमाडे (४९) यांच्या १९ आॅगस्ट रोजी लक्षात आले़ त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदविली होती़ सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी याबाबत सखोल तपास केल्यानंतर ही दोन्ही वाहने सौम्या अर्थमुव्हर्स या नावाने खरेदी करण्यात आल्याचे समोर आले़ तसेच ही दोन्ही वाहने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्सने जप्त केल्यानंतर संशयित दीपक गिरधरलाल पटेल याने खरेदी केलेली वाहने तपासणीसाठी न आणता त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र तयार केले़ ही दोन्ही वाहने आंध्र प्रदेशातील कुरणाल येथे असल्याचे समजताच ती जप्त करण्यात येऊन पटेल यास अटक करण्यात आली़ दरम्यान, यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी व काही एजंट यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, कर्मचारी व एजंट यांची अभद्र युती पुन्हा एकदा समोर आली आहे़
आरटीओ संकेतस्थळ हॅकिंग प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:15 AM