नाशिक : नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता आदिवासी व बिगर क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेस ११४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील मार्ग व इतर जिल्हा मार्गांची दुरुस्ती कामास चालना मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ११४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. निधीमुळे रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. आदिवासी उपयोजनेसाठी १० कोटी ६५ लाख, आदिवासी उपयोजना किमान गरजांसाठी ३ कोटी ६० लाख, आदिवासी उपयोजना माडासाठी ५ कोटी ३६ लाख ५२ हजार, आदिवासी उपयोजना माडा १ कोटी, आदिवासी उपयोजना अतिरिक्त ३७ कोटी ६९ लाख, आदिवासी उपयोजना २० कोटी तर बिगर आदिवासींसाठी १९ कोटी, याप्रमाणे निधी लेखाशीर्ष करण्यात आले आहे.
रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:38 AM