शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST

राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले होते.

शैलेश कर्पे, सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद मिळाले होते तर आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. सिन्नरच्या राजकारणात मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या उभय नेत्यांमधला राजकीय प्रवास कधी मैत्रीचा सुगंध देणारा तर कधी पराकोटीचा संघर्ष करणारा आणि शेवटी गोडवा देणारा ठरला. मात्र, गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तुकाराम दिघोळे यांच्या पश्चात कोकाटे यांना मात्र या निकालाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एकप्रकारे आव्हानच उभे केले आहे.

१९८५ साली तुकाराम दिघोळे समाजवादी काँग्रेसकडून आमदार झाले, त्यावेळी माणिकराव कोकाटे अतिशय युवा कार्यकर्ते होते. कोकाटे काँग्रेसचे विचाराचे असल्याने या निवडणुकीत त्यांनी दिघोळे यांच्या विरोधात काम केले होते. पुढे समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन झाल्यानंतर कोकाटे आणि दिघोळे एकत्र आले. १९९०च्या निवडणुकीत कोकाटे यांनी दिघोळे यांचा प्रचार केला. दिघोळे दुसऱ्यांदा आमदार झाले. पूर्व भागातील मराठा युवा कार्यकर्ता मिळाल्याने दिघोळे-कोकाटे मैत्री फुलली. याच काळात कोकाटे यांना दिघोळे यांच्या शिफारसीवरूनच मुख्यमंत्री कोट्यातून विसे मळा याठिकाणी सदनिका मिळाल्याची चर्चा होती. १९९२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत माणिकराव कोकाटे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य झाले आणि सिन्नर पंचायत समितीचे सभापती झाले. कोकाटे यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापतिपदही मिळविले. या काळात कोकाटे यांचा संपर्क अॅड. भगीरथ शिंदे यांच्यासोबत जवळून आला. १९९५ ला दिघोळे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली तर कोकाटे यांनी भगीरथ शिंदे यांना मदत केली. कोकाटे पंचायत समितीचे सभापती असताना दिघोळे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. कोकाटे यांनी पंचायत समितीच्या सभापतिपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्वास आणला गेला. दिघोळे यावेळी युती सरकारमध्ये राज्यमंत्री होते. कोकाटे यांनी बाबूराव आव्हाड नामक पंचायत समिती सदस्य यांना अज्ञातस्थळी हलवून अविश्वास ठराव फेटाळून लावला. येथूनच दिघोळे-कोकाटे संघर्षाला प्रारंभ झाला. याच काळात दिघोळे यांनी सरकारी कोट्यातून मिळालेल्या सदनिकेची चौकशी लावल्याचे समजते. त्यांनतर कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

पाच वर्षे दिघोळे-कोकाटे संघर्ष पेटतच राहिला. पुन्हा २००४च्या निवडणुकीत दिघोळे-कोकाटे आमने-सामने आले. दुसऱ्यांदा कोकाटे यांनी दिघोळे यांना विधानसभा निवडणुकीत २० हजारांच्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर २००९ विधानसभा निवडणुकीत प्रकाश वाजे आणि कोकाटे यांच्यात यावेळी दिघोळे यांनी प्रकाश वाजे यांचे काम केले. मात्र, वाजे पराभूत झाले. सुमारे दोन दशके दिघोळे-कोकाटे संघर्ष सिन्नरकरांनी अनुभवला. त्यानंतर शेवटच्या काळात दिघोळे-कोकाटे यांच्यात गोडवा निर्माण झाला. २०१४च्या निवडणुकीत दिघोळे हे कोकाटे यांच्या व्यासपीठावर आले. तथापि, या निवडणुकीत कोकाटे पराभूत झाले आणि राजाभाऊ वाजे आमदार झाले. अगोदर विरोधक नंतर मैत्री पुन्हा दोन दशके जोरदार राजकीय संघर्ष आणि शेवटी गोडवा, असा दिघोळे-कोकाटे राजकीय जीवनपट सिन्नरकरांनी अनुभवला. राज्यमंत्री असताना दिघोळेंचा पराभवदिघोळे राज्यमंत्री असताना १९९९ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेला दंड थोपटले आणि शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली. राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले. यावेळी सिन्नर तालुक्याला दिघोळे-कोकाटे यांच्यातील तीव्र संघर्ष अनुभवायला मिळाला. यावेळी नायगाव जिल्हा परिषद गटातूनही दिघोळे यांच्या पत्नी आशाताई दिघोळे यांना नायगाव गटातून पराभूत करण्यासाठी कोकाटे यांनी जंग जंग पछाडले व पराभूत केले.

टॅग्स :NashikनाशिकManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार