नाशिक : आरोग्यास घातक असलेल्या रसायनांपासून बनवलेला आणि सर्वत्र बंदी असलेलाएमडी हा अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. या प्र्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) प्रमुख सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे.यातील एका उच्चशिक्षित आरोपीने पालघर जिल्ह्णातील बोईसर येथील प्रयोगशाळेत एमडी तयार करण्याचा उद्योग सुरू केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या अड्ड्यावर छापा टाकून साडेचार किलो अमली पदार्थांसह एमडी पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रुड पावडर आणि इतर साहित्यासह १ कोटी ८० लाख ४७ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.एमडी तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांकडून ३ कोटी २० लाख ८८ हजार सहाशे रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी शनिवारी (दि.२६) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली. रवींद्रकुमार सिंघल म्हणाले, शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात आडगाव परिसरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी फाटा परिसरातील हरिविश्व सोसायटीच्या सी विंगमध्ये राहणारा रणजित मोरे (वय ३५ वृंदावननगर) येथील त्र्यंबक हाउसिंग सोसायटीत राहणारा पंकज दुंडे (३१) श्री साई रो-हाउसमधील नितीन माळोदे ( ३२) यांच्या चारचाकीवर वाहनावर नजर ठेवून शिताफीने या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २६५ गॅ्रम अमली पदार्थ, सफारी कार असा एकूण १५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने या घटनेत मोठे रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयातून असल्यामुळे नाशिक पोलिसांनी घटनेचा तपास करण्यासाठी दोन पथके मुंबईत पाठवले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांनी मुंबईतील नागपाडा येथील सलीम सौरठीया (३०)व सैफउल्ला फारु ख शेख (२३) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सव्वादोन किलो अमली पदार्थ व जग्वार कार असा १ कोटी २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर हा अमली पदार्थ अरविंदकुमार नामक याच्याकडून घेत असल्याचे समोर आले. दरम्यानच्या काळात तो उत्तर प्रदेशात फरार झाल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह गुन्हे शाखा एकच्या पथकाने अरविंदकुमार यास अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतरत्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो अरविंदकुमार अमली पदार्थ तयार करत असल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने बोईसर येथे छापा टाकू न साडेचार किलो एमडी अमली पदार्थांसह १८ किलो क्रुड पावडर, एमडी पावडर तयार करण्यासाठी लागणारे प्रयोगशाळेतील साहित्य असा एकूण १ कोटी ८० लाख ४७ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी पाठविण्यात आले आहे.
नाशकात अमली पदार्थाचे रॅके ट उद््ध्वस्त एक कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:44 AM
नाशिक : आरोग्यास घातक असलेल्या रसायनांपासून बनवलेला आणि सर्वत्र बंदी असलेलाएमडी हा अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्देप्रमुख सूत्रधारासह दोघांना अटक केली१ कोटी ८० लाख ४७ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत