सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येला सुरु वात झाली असून, पहिल्याफेरीत १३०० पैकी अवघ्या ५२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गेल्या पाच वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यास सुरु वात केली आहे. आयटीआय प्रवेशाची माहिती देण्यासाठी स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले होते. आॅनलाइन प्रवेशाची माहिती, अर्ज कसा भरावा, कॅप राउंड, प्रवेश निश्चिती याची माहिती उपलब्ध करून दिली जात होती. त्यासाठी संस्थेच्या कार्यालयात दररोज प्रवेशपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात आली. प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३३९९ प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. ११ ते दि. १५ दरम्यान प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली होती. या काळात अवघ्या ५२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशास अल्पप्रतिसाद लाभत असून, एक दिवसाची मुदत वाढविण्यात आली आहे. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्र म आणि ६२ तुकड्या आहेत.
आयटीआय प्रवेशास एक दिवस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:55 PM