येवला : शहरातील सत्येनमोहन गुंजाळ यांनी शेतकरी समस्यांसाठी शेतकरी सहवेदना असणाऱ्या कार्यकर्त्यांसह सोमवारी दिवसभर अन्नायाग करीत संध्याकाळी महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वार येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून शेतकºयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. ३२ वर्षांपूर्वी (१९ मार्च १९८६) रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालती व ४ मुलं यांनी पवनार जवळील दत्तपुर येथे जाऊन आत्महत्या केली होती. ही शेतकरयांची पिहली सामूहिक आत्महत्या मानली जाते. त्यानंतर ३२ वर्षात सातत्याने शेतकरयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत अन्न दात्या साठी अन्न त्याग ही संकल्पना अमर हबीब यांनी मांडली होती.या पाशर््वभूमीवर हे उपोषण करण्यात आले. यावेळी डॉ सुरेश कांबळे ,विश्वलता महाविद्यालयाचे विश्वस्त, भूषण लाघवे, दीपक देशमुख, विजय खोकले, बाळासाहेब देशमुख, गणेश पंडित, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, मधुसूदन राका, मायराम नवले, राजू खैरनार, राजू संसारे, दीपक गुंजाळ, सुमित थोरात आदींसह कार्यकर्ते यांनी उपस्थित होते़
येवल्यात एकदिवसीय उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:49 AM