केरळ पूरग्रस्तांना देणार एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:36 PM2018-08-18T23:36:01+5:302018-08-19T00:15:38+5:30
नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, तलाठी संघटनेनेही त्यास पाठिंबा दिला आहे.

केरळचे संकट राष्टÑीय आपत्ती असून, महाराष्टÑ सरकारनेदेखील २० कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे, तर ठिकठिकाणाहून पूरग्रस्तांना पाणी, खाद्यपदार्थ, कपड्यांची मदत केली जात आहे. केरळमध्ये हजारो व्यक्तींची घरे पुरात वाहून गेल्याने ते बेघर झाले असून, अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी घेऊन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सर्वांनीच प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जिल्हा तलाठी संघटनेनेही प्रशासनाला पत्र देऊन एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शविली आहे.