नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.दि. ७ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाच्या संमतीने सदरच्या बदल्या केल्या जाव्यात असे ठरलेले असताना त्यात प्रत्येक जिल्ह्णातील निवासी उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांच्या बदल्या कराव्यात की नाही याचा गोंधळ सुरू असतानाच, ज्यांच्यावर शासकीय सेवेत दिवाणी वा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले त्यांना निवडणुकीचे कामे द्यायची की नाहीत याबाबत संभ्रम आहे. अशी एकूण परिस्थिती असताना दुसरीकडे मंत्रालयात दिवसरात्र बदल्यांचे प्रस्तावावर काम सुरू असून, कोणत्याही क्षणी अधिकाºयांच्या बदल्या होतील, असे वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण झाले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांचे विभाग निहाय चार, चार दिवसांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे प्रशिक्षण सोमवार ११ ते १४ फेब्रुवारी या चार दिवसाच्या काळात औरंगाबाद येथे होणार असून, इतक्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी सहभागी होणाºया अधिकाºयांच्या राहण्या-खाण्याच्या सोयीपासून आयोगाने हात झटकले आहेत. प्रशिक्षणाला येणाºया अधिकाºयांनी स्वखर्चानेच आपले ‘चोचले’ भागवावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस चालणाºया या प्रशिक्षण कालावधीत गैरहजर राहणाºयांवर कडक कारवाईचे संकेत देतानाच प्रत्येकाची हजेरीही घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’नेनिवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्णात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीपात्र अधिकाºयांची यादी व त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’ने तयार करून ते सरकारला सादर केले आहेत.
एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:25 AM
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा अजब फतवा : अधिकाऱ्यांपुढे स्वखर्चाचा पेच