वणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेन्ड कर्फ्युला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत वणी शहरात १०० टक्के बंद पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.वणी शहरात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तत्पुर्वी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यू पाळण्यात आला. शहरात गेल्या तीन ते चार दिवसात अप्रिय घटना घडल्या आहेत. तसेच बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.बाधितांची संख्या लक्षात घेता एका शैक्षणिक इमारतीचे रुपांतर कोविड सेंटरमधे करण्याबाबत हालचाल सुरु आहे. तर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर व तत्सम आरोग्य सुविधा पूर्तीसाठी आरोग्यविभाग कार्यरत आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागताच नागरिकांनी त्वरित तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वणी शहरात शंभर टक्के बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 7:13 PM
वणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या वीकेन्ड कर्फ्युला व्यावसायिकांनी प्रतिसाद देत वणी शहरात १०० टक्के बंद पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
ठळक मुद्देवणी शहरात सोमवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.