निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या वीकेंड बंदला व्यापारीवर्गासह ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.निऱ्हाळे-फत्तेपूर येथे शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजल्यापासून ग्रामस्थांनी आपले व्यवसाय व दुकाने बंद ठेवली आहे. कोणीही नागरिक कामाशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. कठोर अंमलबजावणी करण्यासाठी वावी पोलीस ठाण्याचे पथक दिवसरात्र स्थानिक प्रशासनासह प्रयत्नशील आहे.गाव बंददरम्यान नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही कामाशिवाय घराच्या बाहेर पडत नाही.कामगार पोलीसपाटील शिवाजी शिंदे व संगीता काकड तसेच सरपंच मनीषा यादव व उपसरपंच विष्णू सांगळे, अण्णा काकड, राजेंद्र वाघ, शशिकांत केकाणे, बाळासाहेब दराडे, गणेश यादव, संदीप देशमुख, विलास शिंदे, ज्ञानेश्वर सांगळे आदी कार्यरत आहेत.(११ निऱ्हाळे)निऱ्हाळे-फत्तेपूर येथे वीकेंड निर्बंध काळात वावी पोलीस ठाण्याचे फिरते पथक.
निऱ्हाळे-फत्तेपूर येथे शंभर टक्के कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:03 PM
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या वीकेंड बंदला व्यापारीवर्गासह ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देनागरिकही कामाशिवाय घराच्या बाहेर पडत नाही.