नाशिक : सौंदाणा ते वघई या राष्ट्रीय मार्गावर पिंपळगाव वाखारीनजीक ईरटीका कारला झालेल्या अपघातात मालेगाव तालुका भूमिअभिलेख अधीक्षक भगवान शिंदे जखमी झाले.पिंपळगाव वाखारी येथे दुपारी वेगात असलेल्या ईरटीका कार चालवित असताना नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल गटारीत जाऊन पडली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान होऊन चालक मालेगाव तालुका भूमिअभिलेख अधीक्षक भगवान शिंदे हे जखमी झाले. त्यांना तत्काळ देवळा येथे प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात येऊन उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.सध्या सौंदाणे ते वघई या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह चालकांकडून करण्यात येत आहे.
वाखारीनजीक अपघातात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:31 AM