नाशिक : पेठरोड येथिल तीन पुतळा रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर दुचाकी आढळून झालेल्या अपघातात 18 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत भरधाव दुचकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक ठार झाल्याची घटना त्र्यंबकनाका सिग्नल येथे घडली.अपघातात भराडवाडीतील सुनिल बाळू सावंत (18) ठार झाला आहे. सावंत व त्याचा चुलत भाऊ सचिन सावंत असे दोघेजण दुचाकीवरून पेठरोड आरटीओकडून फुलेनगर तीन पुतळा रस्त्याने जात असतांना दुचाकी दुभाजकावर धडकली त्यात सुनिल जखमी झाला होता घरी गेल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्याने त्याच्या वडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतांना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याबाबत हवालदार अरुण गायकवाड तपास करीत आहेत.
भरधाव दुचकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक ठार झाल्याची घटना त्र्यंबकनाका सिग्नल येथे १० जुन रोजी घडली. त्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. योगेश सुरेश पिंगळे (५०, रा. गणेश चौक, नवीन नाशिक) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १० जुनला पिंगळे यांनी आपली दुचाकी एमएच १५, इके ५३२९ या गाडीवरून भरधाव त्र्यंबकनाका सिग्नलवर जिल्हापरिषदेकडे सिग्नल तोडून प्रवेश केला. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी ओम सर्व्हिसेस पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या बॅरेकेटवला धडकली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.