ठळक मुद्दे दोन अनोळखी इसम टोपी घातलेली व दोघांनी अंगावर शाल घेतलेल्या होत्यासोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चांदवड : रायपूर शिवारात दोन अज्ञात इसमांनी पावणेतीन वाजेच्या सुमारास रोख रक्कम २५ हजार रुपये व ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, अशी फिर्याद संजय केशव घोरपडे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली.घोरपडे झोपलेले असताना दोन अनोळखी इसम टोपी घातलेली व दोघांनी अंगावर शाल घेतलेल्या होत्या. त्यांनी घरात प्रवेश करून २५ हजार रुपये रोख व नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत घोरपडे यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फुलमाळी करीत आहेत.