लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : वनमहोत्सवांतर्गत १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वृक्षलागवड सप्ताहाची सिन्नर वनविभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली. तालुक्यात १ ते ७ जुलै या काळात एक लाख ३४ हजार वृृक्षांची लागवड केली जाणार असून, तितकी रोपे उपलब्ध झाली आहेत. गेल्या वर्षी एकाच दिवसात राज्यभर वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला होता. यावर्षी त्यात बदल करण्यात आला असून, १ ते ७ जुलै या काळात राज्यात चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १) शिवडेत वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते वृक्षलागवड करून सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे. वनविभागाकडून ७८ हजार ५०० रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यात शिवडे शिवारात ४० हजार, चापडगाव शिवारात २७ हजार ५००, तर दापूर शिवारात ११ हजार रोपे लावली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली.
वनमहोत्सवात दीड लाख रोपे लावणार
By admin | Published: July 01, 2017 1:01 AM