सिडकोतुन केरळसाठी एक लाख रुपये व ट्रकभर सामानाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 06:02 PM2018-08-29T18:02:30+5:302018-08-29T18:03:53+5:30
नाशिक/सिडको :केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. महापुरानंतर आता केरळमध्ये मोठी हानी झाली असून केरळवासींयांना मदतीची खुप गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिडकोतून मोठ्या प्रामणात केरळी बांधवाना मदत करण्याकरिता मदतीचे हात पुढे आले आहे.
सिडकोतील मुस्लिम बांधावाच्या फीरदोस मस्जिद मधील शुक्र वारच्या नमाज पठनानंतर खतीब ए शहर हाफीज हीसोमोद्दीन खतीब यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या एका तासात बावीस हजार रु पयांचा निधी संकलीत करण्यात आला, तर नमाज पठनात केरळ मधील नागरिकांसाठी विशेष दुवा करण्यात यावेळी करण्यात आली. सदर निधी संकलनांसाठी मोईन शेख, साजिद पटेल, नवीद जहांगिरदार, जावेद शेख, मोहम्मद शेख आदी मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले.
तर दुसरीकडे नाशिक मल्याळी कल्चरर असोसिएशन तर्फे सुमारे दोन ट्रक साहित्य संकलीत करण्यात आले. यांमध्ये किराणा माल, कपडे, औषधी, पिण्याचे पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. तर रोख स्वरूपात जमा झालेली एक लाख रु पयांची रक्कम मुख्यमंत्री सहायतानिधीत जमा करण्यात येणार आहे.
याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष गोगूलम पिल्ले, अनुव पुष्पानं, सोनू जॉर्ज, गिरीश नायर, विन्न्न पिल्ले, राधाकृष्ण पिल्ले, नीतू मनोज, विपिन भास्कर आदींसह मायको, बॉश, संदीप फाउंडेशन, एच.ए. एल. क्रु षी धारा, शिवसरस्वती आदी उपस्थित होते.