लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : चाळीसगाव फाट्यावर शनिवारी रात्री गोरख नामदेव जाधव (५०) रा. गिगाव याचा खून झाला असून, याप्रकरणी शहबाज अंजुम मेहमूद अहेमद, (२०) रा. हकीमनगर ग.नं. मालेगाव, नूर अमीन नियाज अहेमद ऊर्फ सोनू (२२) रा. हकीमनगर गल्ली नंबर मालेगाव, नूर अमीन नियाज अहेमद ऊर्फ सोनू (२२) रा. हकीमनगर या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तीन इसम राखाडी रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या युनिकॉर्न दुचाकीवरून दुचाकीवरून प्रथम चिखलओहोळ येथील प्रकाश रामदास सोनवणे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील भ्रमणध्वनी संच व पैसे बळजबरीने हिसकावून आयेशानगर येथील मोहम्मद हनीफ शेख रफीउद्दीन यांना चाळीसगाव फाट्यावर मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल व पैसे बळजबरीने हिसकावून फरार झाले.तिघा संशयित आरोपींनी गोरख नामदेव जाधव रा. गिगाव यांना आर. आर. उद्योग समोर चाकूचा धाक दाखवून भ्रमणध्वनी व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. गोरख जाधव यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले.गोरख जाधव यांनी आवाज दिला असता समोरून देवेंद्र बाळासाहेब पवार व काही जण पळत आले तोपर्यंत गोरख जाधव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी शहबाज अंजुम महेमूद अहमद, नूर अमीन नियाज अहमद ऊर्फसोनू आणि मोहंमद युसूफ मोहंमद ऊर्फयसुफ भुऱ्या यांना पकडले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र भदाणे व सहकाऱ्यांनी अवघ्या दोन तासात आरोपींना पकडून ११ भ्रमणध्वनी संच, रोकड व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहे.
मालेगावी चाळीसगाव फाट्यावर एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 10:17 PM
मालेगाव : चाळीसगाव फाट्यावर शनिवारी रात्री गोरख नामदेव जाधव (५०) रा. गिगाव याचा खून झाला असून, याप्रकरणी शहबाज अंजुम मेहमूद अहेमद, (२०) रा. हकीमनगर ग.नं. मालेगाव, नूर अमीन नियाज अहेमद ऊर्फ सोनू (२२) रा. हकीमनगर गल्ली नंबर मालेगाव, नूर अमीन नियाज अहेमद ऊर्फ सोनू (२२) रा. हकीमनगर या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ठळक मुद्देतिघांना अटक : दुचाकीसह ९४ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त