चांदवड : तालुक्यातील चांदवड पाथरशेंबे रोडवर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला.
याबाबत दत्तात्रय गोविंद कोतवाल रा. कोतवालवस्ती यांनी चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली. रविवार दि. १४ मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोतवाल यांचे वस्तीसमोर चांदवडकडून मनमाडकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने सचिन सदाशिव ठाकरे (२७) व राहुल आत्माराम दवंगे (१४) रा. साळसाणो या दोघांचा अपघात झाला. त्यात सचिन सदाशिव ठाकरे रा. साळसाणे हा ठार झाला. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.