नामपूर : शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतिनिमित्त येथील बाजार समितीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र मास सुरवात करण्यात आली . अध्यक्षस्थानी सभापती भाऊसाहेब भामरे होते . प्रास्तविक आयोजक खेमराज कोर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून नामपूरचे सरपंच अशपाक पठाण, ज्येष्ठ नेते अशोक सावंत होते . शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या कार्य कर्तृत्वाचा उजाळा ज्येष्ठ नेते अणासाहेब सावंत , भाऊसाहेब अहिरे ,दीपक पगार ,साहेबराव सावंत , विनोद पाटील ,आनंदा मोरे , भास्कर सावंत ,विजय सावंत यानी आपल्या मनोगतातून मांडला. याप्रसंगी उपसभापती लखन पवार , विनोद सावंत, डी डी खैरनार , कृष्णा भामरे , शरद सावंत , प्रवीण सावंत,सचिन मुथा , दगाजी बच्छाव , शशिकांत कोर ,हेमंत कोर ,दीपक सावंत , विजय सावंत , जिभाऊ कोर , साहेबराव सावंत उपस्थित होते . सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले.----------------------शरद जोशी यांच्या विचार व प्रेरणेमुळेच आज बळिराजाचे अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या सहवासात आपण काम केल्यामुळे त्यांचे स्मरण जनतेला कायम टिकवण्यासाठी आपण विचार मंचची स्थापना केली आहे .येत्या १२ डिसेंबरला पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेणार आहोत.- खेमराज कोर अंबासन
शरद जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 2:31 PM