चांदवड - तालुक्यातील वडाळीभोई येथील ४० वर्षीय व्यक्तीस त्रास होऊ लागल्याने तपासणीअंती त्यांना डी.सी.एच.सी. येथे भरती होण्यास सांगितले सदर रु ग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे सदर हरणाचे रविवार परिसर कंटेनमेंट घोषित करु न सील करण्यात आला आहे. सपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट यांना सी.सी.सी. सेंटर येथे भरती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. व्यवसाय व इतर कारणाने बाहेर गावी जात असताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, हात वारंवार साबणाने धुवावेत सैनिटायझरचा वापर करावा घाबरून जावू नये परंतू जागरु क राहावे असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले. वीज वितरण कार्यालयातील पॉझिट्व्हि आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार कर्मचारी व एक संशयीत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वडाळीभोईत एक पॉझीटिव्ह , वीज कंपनीतील संपर्कातील पाच अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 6:32 PM