शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:16 AM

अपघातातील नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास पाच ते सहा संशयितांनी बेदम मारहाण करून मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सिडकोतील शुभम पार्क येथे घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष गायकवाड यास अटक केली आहे़

नाशिक : अपघातातील नुकसानीच्या भरपाईची मागणी करून एकास पाच ते सहा संशयितांनी बेदम मारहाण करून मोबाइल खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि.४) सकाळी सिडकोतील शुभम पार्क येथे घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष गायकवाड यास अटक केली आहे़  चेतन दत्तात्रय पिंगळे (रा. पवननगर, सिडको) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास संशयित संतोष गायकवाड व त्याचे सहा साथीदार कारमधून (एमएच १५, एफएफ ९०७०) आले़ त्यांनी जुन्या अपघाताची कुरापत काढून भरपाईच्या पैशांची मागणी केली. त्यावरून संशयितांनी चेतनला कारमध्ये बसवून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडील सॅमसंगचा मोबाइल व सीमकार्ड बळजबरीने काढून घेतला़ या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदिरानगरमध्ये तरुणाची आत्महत्यापाथर्डी फाट्यावरील प्रशांतनगरमधील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़५) दुपारच्या सुमारास घडली़ शुभम अशोक चव्हाण (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शुभमने बेडरूममधील पिलरला ओढणीद्वारे गळफास घेतला़ त्यास मित्र प्रणव लहामगे याने उपचारासाठी दाखल केले असता डॉ़ गडे यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.दहा वर्षीय मुलाचे अपहरणहिरावाडीतील भगवतीनगरच्या तुळजाभवानी उद्यानात खेळत असलेला दर्शन ज्ञानेश्वर पवार या दहा वर्षीय मुलाचे शनिवारी (दि़४) दुपारी अपहरण केल्याची घटना घडली़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा