नाशिक : भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद महामार्गावरील मिर्ची हॉटेलजवळ गुरुवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदूर नाक्यावरील निसर्गनगरमधील स्वामी पवार (१९) हा युवक रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मैत्रीण प्रियांका सोनवणेसोबत दुचाकीवरून (एमएच १५, डीएफ ०३४८) विडी कामगारनगरजवळील मिर्ची हॉटेलजवळून जात होते़ यावेळी भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाचे कारने (एमएच १५, जीए ४९२५) दुचाकीला धडक दिली़ यामध्ये पवार व सोनवणे हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या प्रकरणी स्वामी पवार यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी चारचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़
दुचाकीस्वारासह एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:31 AM