पॅनेलने जनसेवा पॅनेलचा ९ विरुद्ध शून्य असा दणदणीत पराभव केला. सलग चार पंचवार्षिक म्हणजे वीस वर्ष जनसेवा पॅनेलचे नेतृत्व करणारे निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांना एकही जागा मिळू शकली नाही. पीरसाईबाबा परिवर्तन पॅनेलच्या रब्बाना निजाम शेख या बिनविरोध निवडून आल्यावर उर्वरित आठ जागांसाठी मतदान झाले होते. येथील ग्रामपंचायतीच्या इतिहासात कधीही घडले नाही, असे अभूतपूर्व यश किरण चंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पिरसाईबाबा परिवर्तन पॅनेलने घडवून आणले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये तानाजी काळू ठाकूर, तुळशीराम फकीरा भालेराव, हौसाबाई नामदेव माळी हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये आयुब मोहम्मद शेख, मुक्ताबाई विठ्ठल चंद्रे हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये पीरसाईबाबा परिवर्तन पॅनेलच्या रब्बना पटेल या बिनविरोध निवडून आल्या होत्या. प्रभाग तीनमध्ये वाल्मिक बाळासाहेब जुंधारे, रंजना केशव कदम, आयशा निसार पठाण यांनी बाजी मारली.
फोटो - २५ कोळगावमाळ ग्रामपालिका
कोळगाव माळ येथील निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना पीरसाईबाबा पॅनेलचे विजयी उमेदवार, कार्यकर्ते व ग्रामस्थ.