या योजनेचा प्रसार व प्रचार सुरू झाल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक कुटुंबे पुढे येत असून, विशेषकरून ग्रामीण भागातील महिला एका वा दुसऱ्या मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेत आहेत. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी १२० प्रस्ताव महिला व बाल कल्याण विभागाकडे दाखल झाले असून, त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून ३० लाख रुपयांची मागणी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
चौकट====
सुरगाणा मात्र पिछाडीवर
शासनाच्या या योजनेपासून सुरगाणा, पेठ या दोन आदिवासी तालुक्यांत मात्र फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आदिवासी समाज व त्यांच्यातील रूढी, परंपरा तसेच अज्ञानामुळे पेठ तालुक्यातून एकमेव प्रस्ताव दाखल झाला असून, सुरगाणा तालुक्यात मात्र एकही महिला पुढे आलेली नाही. अन्य तालुक्यात मात्र देवळा-५, कळवण-७, नाशिक ग्रामीण-६, त्र्यंबकेश्वर-५, बागलाण-२, येवला-७, सिन्नर-३, मालेगाव-११, चांदवड-२, मालेगाव-८, दिंडोरी- ९, इगतपुरी-६, असे प्रमाण आहे
चौकट====
नाशिक शहर आघाडीवर
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मात्र या योजनेचा चांगलाच प्रचार झाला असून, तब्बल ४८ महिलांनी एक वा दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली आहे. शहरी भागातील जनतेत असलेली जागृती व मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलींना सर्वस्वी मानण्याचा चांगला संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे. मात्र, निफाडसारख्या सधन तालुक्यातून एकही महिला पुढे आलेली नाही, हे धक्कादायक आहे.