गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याच्या हेतूने नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील शेतकºयाला शासनाकडून देण्यात आलेले अनुदान दुसºयाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मोहेगावच्या या शेतकºयाला त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट सिलिगुडीला गेल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ‘घाम गाळला एकाने.. लाभ मिळाला दुसºयाला.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्यावर्षी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला गेला. शेतात पीक न आल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. या अवघड परिस्थितीमध्ये शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक शेतकºयाच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली होती.मोहेगाव येथील शेतकरी बाजीराव गणपत गंधाक्षे या शेतकºयाच्या नावावर १३ हजार सहाशे रुपयांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते. सदरचे अनुदान अन्य शेतकºयांच्या खात्यावर आॅनलाइन जमा झाले असले तरी गंधाक्षे यांच्या खात्यावर मात्र अनुदान जमा झालेच नाही. अनेक महिने वाट पाहूनही खात्यावर अनुदान जमा झाले नसल्याने त्यांनी त्यांचे खाते असलेल्या मनमाड येथील युनियन बॅँक तसेच तहसील कार्यालयात धाव घेतली. अनेकवेळा या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. खातेक्रमांकामध्ये एक आकड्याचा बदल झाल्याने सदरचा प्रकार घडला असावा, असे सांगण्यात येते. दरम्यान, गंधाक्षे यांच्या अनुदानाची रक्कम सिलिगुडी येथील खात्यावर जमा झाल्याची माहिती बॅँक अधिकाºयांनी दिली असल्याचे गंधाक्षे यांनी सांगितले.आपल्या हक्काचे अनुदान आपल्याला मिळावे यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान आपल्या खात्यावर जमा न होता दुसºयाच्या खात्यावर जमा झाले असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही होऊन अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.शासनाकडून शेतकºयांना देण्यात येणारे माझे अनुदान माझ्या खात्यावर जमा न होता सिलिगुडी येथे जमा झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले. तरी सदरचे अनुदान मला मिळावे यासाठी तक्रारी केली आहे.- बाजीराव गंधाक्षेशेतकरी, मोहेगाव,ता. नांदगाव
घाम गाळला एकाने, लाभ मिळाला दुसऱ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:57 PM
मनमाड : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याच्या हेतूने नांदगाव तालुक्यातील मोहेगाव येथील शेतकºयाला शासनाकडून देण्यात आलेले अनुदान दुसºयाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मोहेगावच्या या शेतकºयाला त्यांच्या अनुदानाची रक्कम थेट सिलिगुडीला गेल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ‘घाम गाळला एकाने.. लाभ मिळाला दुसºयाला.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देमनमाड । मोहेगावच्या शेतकºयाचे अनुदान गेले सिलिगुडीला; खातेक्रमांकात बदल