येवला : तालुक्यातील कुसुमाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गाची जबाबदारी एकच शिक्षक सांभाळत असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सचिन पवार जिल्हा परिषद शाळा कुसमाडी यांना येथील एक शिक्षक अचानक रजेवर गेले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पक्षाचे तालुकाप्रमुख यांच्याशी संपर्क साधला आणि तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचेच्या नुकसान होत असून कोणतीही पूर्वसूचना न देता संबधित शिक्षक रजेवर गेला असून दोन दिवसात शिक्षक न मिळाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, तालुकाप्रमुख अमोल फरताळे, सचिन पवार, गोविंद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिली ते चौथीच्या वर्गाला एकच शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 8:01 PM
येवला : तालुक्यातील कुसुमाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गाची जबाबदारी एकच शिक्षक सांभाळत असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्दे येवला : कुसुमाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतीची परिस्थिती