नाशिक : ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघातील विविध गावांमधून सुमारे २५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून, प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये दिवसेंदिवस रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या पालनाविषयी वाढत चाललेली उदासीनता हे यामागील मुख्य कारण असल्याने यावर्षी नाशिक आरटीओकडून ग्रामीण भागात जनजागृती करण्याकरिता रविवारी (दि.७) ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ हजार किलोमीटरच्या परिघात बाइक रॅली काढण्यात आली. सकाळी ८ वाजता पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सुरेंद्र निकम, ड्रायव्हिंग स्कीलचे असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.बाइक रॅलीने ग्रामीण जनतेचे लक्ष वेधून घेत रस्ते सुरक्षेचे नियम व अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतची माहितीपुस्तिका व माहिती पत्रकांचे ठिकठिकाणी वाटप करण्यात आले. विविध जनप्रबोधनपर कार्यक्रमही घेण्यात आले.या बाइकर्स ग्रुपचा सहभागरॉयल हार्टेड, महिंद्र ए.आर.के.ऑटो, द रायडर्स ऑफ नाशिक, ग्रुझिंग गॉड्स ग्रुप, बाइकर्णी नाशिक ग्रुप, युनायटेड फिफ्टीनर्स, वाइनसिटी एचडी ग्रुप, मॅक्सरिस्ट या ग्रुपच्या दुचाकी रायडर्ससह विविध मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनचालकांनीही सहभाग नोंदविला.असा होता रॅलीचा मार्गn २५० दुचाकीस्वारांची चार प्रमुख मार्गांवर विभागणी करण्यात आली होती. n ओझर, पिंपळगाव, वडाळीभोई, चांदवड, मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण, दिंडोरी. n सायखेडा, निफाड, विंचूर, लासलगाव, येवला.n नाशिकरोड, शिंदे-पळसे, सिन्नर, वावी, नांदुरशिंगोटे.n गंगापूर, गिरणारे, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी.
एक हजार किलोमीटर्सची बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 12:53 AM
ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघातील विविध गावांमधून सुमारे २५० दुचाकीस्वारांनी रस्ता सुरक्षेचा जागर करत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
ठळक मुद्देआरटीओचा उपक्रम : चार महामार्गांवरील ४० गावांमध्ये पोहोचविला सुरक्षा संदेश