नाशिक : लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. असलेले रोजगार बंद झाले तर अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण-तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे धाव घेतली आहे. या केंद्राच्या माध्यमातून का होईना रोजगाराची संधी मिळेल या अपेक्षेने केंद्रात मोठ्या प्रमाणात तरुणांनी नावे नोंदविली जात आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून तरुणांना रोजगाराभिमुख व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक खासगी कंपन्यांकडून येथील पात्रताधारकांची यादी मागविली जाते. तसेच या केंद्राच्या माध्यमातूनदेखील खासगी आस्थापनांची माहिती घेतली जाते. जेणे करून नोकरीची संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नोंदणीकृत उमेदवारांना संधी मिळू शकेल. फार मोठ्या प्रमाणात नसली तरी काही तरुण-तरुणींना नोकरीची संधीदेखील मिळून जाते.
--इन्फो--
कोणत्या महिन्यात किती नोंदणी
जानेवारी : ---- तरुण----------- तरुणी
फेब्रुवारी : ------ तरुण --------- तरुणी
मार्च : --------- तरुण ---------- तरुणी
एप्रिल : -------- तरुण ---------- तरुणी
मे : -------- तरुण --------- तरुणी
जून : ------- तरूण --------- तरुणी
जुलै : -------- तरुण ----- तरुणी
ऑगस्ट : --------- तरुण -------- तरुणी
--इन्फो--
अनेकांनी पकडली मुंबई, पुण्याची वाट
१) पुणे आणि मुंबई शहरात नोकरीच्या मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन अनेक तरुण-तरुणी या मोठ्या शहरांकडे वळतात.
२) नावे नोंदविल्यानंतरही अनेकांना वेळेत नोकरीची संधी मिळाली नाही, तर असे उमेदवार नोकरीनिमित्ताने आपले शहर सोडतात.
३) पुण्यात आयटी इंडस्ट्री तर मुंबईत रोजगाराची संधी असल्याने असंख्य तरुण-तरुणी या शहरांमध्ये नोकरी शोधतात.
--इन्फो--
महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजने प्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली. रोजगार व स्वयंरोजगार योजनांमुळे योग्य लाभार्थ्यांना खरोखरच लाभ होण्यासाठी या योजना सुलभ आणि पारदर्शीपणे राबविणे आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही; कारण त्या व्यक्तीस भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची खात्री वाटत नाही. स्वयंरोजगाराकरिता सामान्यपणे समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती देण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन विविध विभागांतर्गत महामंडळामार्फत उमेदवारांना स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देते.