नाशिकरोड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम मंदिराच्या प्रांगणात एक हजार चौरस फूट महारांगोळी साकार करण्यात आलया होती.कार्तिक पौर्णिमेनिमित्त महारांगोळी साकारण्यासाठी जेडीसी बिटको चॅरिटेबल ट्रस्टचे जगदीश चौहाण व महारांगोळी ग्रुपकडून हा उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी सकाळपासून सुमारे २०० किलो रांगोळीच्या सहाय्याने हि रांगोळी साकारली. या रांगोळीमध्ये तीन कलश असलेलं मंदिर, कार्तिक स्वामी, कमळ फूल साकारण्यात आले, तर उर्वरित भागात संस्कार भारतीची रांगोळी साकारण्यात आली होती. गत तीन वर्षांपासून हा उपक्र म राबविण्यात येत आहे. महारांगोळीप्रमुख पूजा अष्टेकर यांच्या नेतृत्वात राधिका गांगुर्डे यांनी कार्तिक स्वामींची प्रतिकृती रेखाटण्यासह सारिका मंचेकर, अमी छेडा, सीमा कासलीवाल, मंदा मुदलियार, मनीषा पडवळ, विणा गायधनी, जान्हवी रास्ते, राजनंदिनी अहिरे, योगीता बारापात्रे, अंजली कुलकर्णी, शीतल काळे, स्वाती झोड, अर्चना भार्गव आदींनी ही महारांगोळी रेखाटली.
एक हजार चौरस फूट महारांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:40 AM