कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी प्रशासनाने नियमांचे पालन करणे बंधनकारक केल्यामुळे वाद्य किंवा डीजेचा वापर बंद आहे. यामुळे सर्वत्र शांततेत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. वडाळे गावात युवक व शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत गावात एका ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली आहे. तेथे अखंड हरिनाम सुरू असून, तरुणांबरोबरच बालगोपाळदेखील त्यात उत्साहाने सहभागी झाले आहेत.
अखंड हरिनामात किरण सोनवणे, नाना शिंदे, सुदाम सोनवणे, सचिन शिंदे, पप्पू शिंदे, मनोज सोनवणे, तुषार सोनवणे, गोरख शिंदे, समाधान शिंदे, किरण शिंदे आदी सहभागी झाले आहेत.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण वर्ग एकत्र आले. प्रशासनाने आवाहन केलेली ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना गावात राबविण्याचा निर्णय घेतला. सर्व गावाने त्याला पाठिंबा दिल्यानंतर उत्साहाने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीपुढे अखंड हरिनाम जप सुरू आहे.
- किरण सोनवणे, वडाळा
(१३ वडाळा) अखंड हरिनामात रममाण झालेले गावातील युवक.
130921\13nsk_27_13092021_13.jpg
अखंड हरी नामात रममाण झालेले गावातील युवक.