शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कांदा आवक झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 10:35 PM

लासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.

ठळक मुद्देसरकारला सलामी देण्यासाठी अघोषीत आवक बंदी?

शेखर देसाईलासलगाव : गेली काही दिवस लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात सर्वच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर कमी झालेली कांदा आवक पाहता खरोखरच कांदा शिल्लक नाही की शेतकरी बांधवांनी आता कांदा निर्यात बंदीमुळे व विविध निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या आर्थिक फटका पाहता एक प्रकारे बाजारात कांदा न आणता सत्तारूढ पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतापाची सलामी देण्याची रणनिती आहे. हे येत्या काही दिवसांतच समजून येणार आहे.सरकारी बाबु जे निर्णय घेतात ते केवळ शहरी लोकांना कांदा योग्य भावात मिळाला पाहीजे यासाठी परंतु कांदा भाव पडतात तेव्हा लवकर केंद्र सरकार ढुंकूनही पाहत नाही हा अनुभव नेहमीच आलेला आहे.कांदा आवक कमी झाल्याने आता केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना पत्र पाठवीत कांदा आवक व उपलब्धता याचे नियोजन मागवले आहे. काही कांदा व्यापारी इजिप्तचा कांदा आणीत आहे. तर कांदा आवक कमी होत असल्याचे पाहुन आता आयातीचा लवकरात लवकर कांदा आणुन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.केंद्र सरकार करणार २००० टन कांद्याची आयात लवकर करून लासलगाव बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी नवा मार्ग शोधला जात आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजेच लासलगाव. बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या एम एम टी सी कंपनीकडून २००० टन कांद्याची आयात करण्यासाठी एक निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी टनामागे ३५२ इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची तयारी आहे. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस ही आयात केली जाईल असे खात्रीशी समजते.परंतु हा कांदा आयात केला तर आज शहरी ग्राहकांना दिलासा मिळेल. परंतु कांदा उत्पादक सरकार विरोधात जातील अशी भिती आहे. ही दिवसात एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा सातत्याने कांद्याचे भाव वाढतात होते, परिणामी देशात एका वेळी कांद्याने शंभरी गाठल्याचे देखील समजत होते.यंदा दाक्षिणात्य भागात पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले. उत्तरेकडील राज्यात देखील खरीप पैकी अजून बाजारात आली नसल्याने व महाराष्ट्रात अजुन लाल कांद्याची आवक सुरू झालीनाही.ती होताच भाव कमी होतील असे दिसत असले तरी नवीन येणारे कांदा पिक काही दिवस चांगला भाव देईल असे जाणकारांनी सांगितले आहे.सोमवारी लासलगांव बाजार समतिीत कांदा आवकेत कमालीची घट होऊन केवळ १५९ वाहनातील १८७२ क्विंटल कांदा किमान १००० ते कमाल ३८२५ व सरासरी ३६०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाले.आवक कमी झाल्याने भावात काही प्रमाणात सुधारणा झाली.दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि.८) सार्वजनिक सुट्टी असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद राहतील असे बाजार समितीच्या वतीने सांगितले आहे.काल गुरूवारी मंगळवारच्या तुलनेत ४२१ रूपयांची घसरण होत ३०२० हा सर्वाधिक भाव लिलावात सकाळी जाहीर झाला. त्यामुळे कांदा उत्पादकात नाराजीचा सूर दिसुन आला.दिनांक ३ आॅक्टोबर रोजी २२० वाहनातील उन्हाळ कांदा १२५२ ते २७००-३०२० मंगळवारी ३३५ वाहनातील ४१३९ क्विंटल कांदा १२५२ ते ३४४१ रूपये भावाने व सरासरी ३२०० रूपये भावाने विक्र ी झाला होता.देशांतर्गत कांद्याचे किरकोळ बाजारात वाढते बाजार भाव कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली देशांतर्गत बाजारात कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या होलसेल व्यापाºयांकडे कांद्याच्या साठ्यावर ५०० क्विंटल तर किरकोळ व्यापाºयांकडे १०० क्विंटल पर्यंत साठवणूक करण्याची मर्यादा आणली आहे.गेल्या दोन-तीन वर्षानंतर कांद्याला चांगले बाजार भाव यंदा मिळत असताना केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.(फोटो ०८ लासलगाव)

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी