नाशिक : जिल्ह्यात कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतकºयांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापाºयांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांदा भावात अद्याप कोणताही फरक पडलेला नाही.वर्षभरापासून गडगडणाºया कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता . भाव वाढल्याने शेतकºयांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. इजिप्तमधून कांदा आयातीचा निर्णय हा त्याचाच एक भाग. कांदा आयातीची माहिती पसरल्याने बाजार समिती आवारात भाव कमी होतील या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत. अचानक आवक वाढल्याने चालू सप्ताहात दर सुमारे ७०० ते ८०० रु पयांनी खाली आले. एकीकडे ही परिस्थिती असताना गुरुवारी प्राप्तीकर विभागाने जिल्ह्यातील चांदवड, येवला, लासलगाव, सटाणा, पिंंपळगाव बसवंत, उमराणा येथील बड्या कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकून चौकशी सुरु केली.या धाडसत्रामुळे गुरुवारी सकाळी बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याचे लिलाव झाले नाहीत. दुपारनंतर लिलाव सुरु झाले तरी व्यापाºयांनी थेट ५०० रुपये कमी भाव पुकारण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांचा संताप झाला. काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले. गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापाºयांनी शुक्रवार व शनिवार लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतकºयांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:59 AM