चांदवड : व्यापारी वर्गाच्या असहकार्यामुळे चांदवड बाजार समितीच्या संचालक मंडळाने चांदवड मुख्य बाजार आवारावरील कांदा शेतमालाचे लिलाव बेमुदत बंद केले होते. हे लिलाव मंगळवारपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, व्यापारी वर्गाने कांदा लिलाव नियमित व पूर्ववत सुरु करण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळास विनंती केल्याने त्यानुसार कांदा लिलावाबाबत बाजार समिती संचालक मंडळाची तातडीची सभा घेतली. सदर सभेत झालेल्या निर्णयानुसार संचालक मंडळासमोर समजदारीची भूमिका घेत बाजार समितीचे नियमाप्रमाणे नियमित कामकाज करण्याचे आश्वासन दिले. तसेच बाजारात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या व्यापारी वर्गाव्यतिरीक्त नवीन ७ ते ८ व्यापारी वर्गास नियमित कांदा खरेदी-विक्रीस परवानगी देणेकामी संमती दर्शविली. मंगळवारपासून (दि. १०) सकाळी ९.३० वा. नियमित कांदा शेतमालाचे लिलाव सुरु करण्याचा निर्णय सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
कांदा लिलाव मंगळवारपासून पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:13 AM
चांदवड : व्यापारी वर्गाच्या असहकार्यामुळे चांदवड बाजार समितीच्या संचालक मंडळाने चांदवड मुख्य बाजार आवारावरील कांदा शेतमालाचे लिलाव बेमुदत बंद केले होते.
ठळक मुद्देलिलाव मंगळवारपासून पूर्ववत होणारलिलावाबाबत बाजार समिती संचालक मंडळाची सभा