पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा बाजारात कांदा लिलाव सुरळीत होत असून सोमवारी कांद्याला 5400 रुपये क्विंटल दर मिळाला. कांदा दर नियंत्रित राहावे यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर काहीसे निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव नियमीत सुरू असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना कांदा खरेदीसाठी खिशाला आर्थिक व्यवस्था करावी लागत आहे. कांदा दर वाढल्याने काही साठेबाजांनी कांद्याची साठवणूक करून कांदा मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने अशा साठे बहाद्दरांना दणका देण्यासाठीव कांदाचे दर नियत्रांत रहावे म्हणून केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले आहे. आडत्यांना 25 क्विंटल, तर व्यापाऱ्यांना 2 क्विंटल कांदा अशी मर्यादा निश्चित केली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, मनमाड उमराणे बाजारसमितीतील व्यापाऱ्यांनी काल लिलाव बंद केले होते. मात्र नाशिकमधील नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा मार्केट येथे कांदा लिलाव सुरळीत सुरू होते. बाजरसमितीत सिन्नर, शिंदे,पळसे, वावी, पांगरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा येथून कांदा आवक होत असते. सोमवारी प्रमाणे शरदचंद्र मार्केटमध्ये दुपारी नियमितपणे लिलाव पार पडले.सोमवारी जवळपास 470 क्विंटल कांदा आवक झाली त्यात सरासरी 4500, किमान 2200 तर कमाल 5400 रूपये पर्यंत बाजारभाव मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. सकाळी अनेक बाजारसमितीत आडतदार व व्यापारी यांनी कांदा लिलाव बंद ठेवत शासनाच्या कांदा साठवणूक निर्बंधाच्या विरोधात लिलाव बंद केले होते. बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत व त्यांची धावपळ टाळण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार बाजार समितीत कांदा लिलाव सुरळीत ठेवले होते.
शरदचंद्र पवार बाजरसमितीत कांदा लिलाव सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 4:31 PM
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या शरदचंद्र पवार कांदा बाजारात कांदा लिलाव सुरळीत होत असून सोमवारी कांद्याला 5400 रुपये क्विंटल दर मिळाला. कांदा दर नियंत्रित राहावे यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर काहीसे निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव नियमीत सुरू असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
ठळक मुद्देकांद्याला कमाल 5400 रुपये दर